उद्देश :

  अनुभवाच्या आदान-प्रदानातून गुणवत्ता वाढविणे.

  वाचकांच्या मेळाव्यातून / बैठकीतून त्यांची पुस्तकांची आवड जाणून घेणे.

  प्रमुख पुस्तकांवर चर्चासत्र आयोजित करणे.

  ग्रंथालय परिसरातील श्रेष्ठ विचारवंत, लेखक आणि वक्ते यांची सूची करणे.

  पत्र लेखकांना मार्गदर्शन करणे.

  झोला पुस्तकालय चालविणे.

  राष्ट्रीय विचारांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला प्रोत्साहन देणे.

  ग्रंथपाल आणि कर्मच्याऱ्याच्या गुणवत्ता बुद्धीसाठी अभ्यासवर्ग आयोजित करणे.

  वाचनालये समाजभिमुख करणे.

  नवीन सार्वजनिक ग्रंथालयाच्या स्थापनेत सहकार्य देणे.

  विभागीय स्तरावर वार्षिक संमेलने आणि अखिल भारतीय स्तरावर दर पांच वर्षांनी संमेलने आयोजित करणे.

  सार्वजनिक वाचनालयांची उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी शासकीय धोरणांचे मूल्यमापन करून त्यात उचित बदल घडवून आणण्यासाठी संघटीत प्रयत्न करणे.

वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ग्रंथालय भारतीचे काम सुरु आहे. वाचक, कर्मचारी, व्यवस्थापनातील पदाधिकारी, लेखक, वक्ते, प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेते या सर्व सार्वजनिक वाचनलायांशी संबंधित असण्याऱ्या घटकांना ग्रंथालय भारतीचे सभासद करून त्यांना या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे वाचन संस्कृती निश्चितच विकसित होणार आहे.

नवीन ग्रंथालयाच्या स्थापनेसाठी आणि कार्यरत असणाऱ्या ग्रंथालयाची श्रेणी सुधारण्यासाठी संस्थेने एक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली आहे. याशिवाय पुष्पांजली, नर्मदा पथदर्शिका या पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. गुलाम जेव्हा माणूस होतो आणि निवडक मुक्तीवेध या पुस्तकांचे विमोचन केले.

महाराष्ट्र शासनाच्या आणि राजा राजमोहन रॉय प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांना संबंधित व्यक्ती आणि ग्रामीण तसेच शहरी वाचनालयांपर्यंत पोहोचविण्याचे ग्रंथालय भारतीची भूमिका मार्गदर्शकांची राहणार आहे.